Nashik Crime News : बोगस बियाणांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना बोगस एफडीचा अनुभव आला आहे. नाशिकमध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये शेतक-यांचा गोंधळ पहायला मिळाला. एफडी बोगस निघाल्याचा आरोप करत शेतक-यांना गोंधळ घातला. बँकेतील कर्मचारी आणि एजंट यांनी संगनमताने शेतक-यांना लाखोंचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. बँकेच्या प्रशासनाने मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.


नेमका काय आहे प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेतून अनेक जणांच्या एफडी बोगस निघाल्यास समोर आले आहे. या बँकेतील कर्मचारी आणि एजंट मिळून अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत काही तक्रारी समोर आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये गोंधळ घातला.


प्रत्येक जण आपल्या एफडी खऱ्या आहे की नाही याचा तपास करत आहे. बँक प्रशासनाला याबाबत विचारले असता प्रशासनाने पोलिसांमध्ये तक्रार केल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलीस लवकरच याबाबतीत तपास करून एफ आय आर नोंदवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, कॅमेरासमोर अधिकृतपणे काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.