जालना : ईसिस या दहशतवादी संघटनेत काम करत असल्याचं सांगत जालना शहराला बॉम्बने उडवून देण्याची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला व्हॉटस अँप मॅसेजच्या माध्यमातून धमकी देण्यात आलीय. या धमकीमुळे शहरात खळबळ माजली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचं नाव आणि फोटो वापरून व्हॉटस अँपच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आलीय. शेख अतिक शेख आयुब ( २९ ) असे या कार्यकर्त्याचं नाव असून त्यांच्याच व्हॉटस अँपवर मॅसेज करून ही धमकी दिली आहे.


वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता शेख अतिक शेख आयुब यांच्या व्हॉटसअँपवर 'मै शेख अतिक शेख अय्युब. एक सुसाईड बॉंबर हू. मै इसीस के साथ काम करता हू. जालना शहर मे 7 मई को बॉंब फोडने वाला हू. महाराष्ट्र जालना पुलिस रोख सकते है तो रोख ले. मैने लोन चुराके पैसा जमा करके बॉंब बनाया है" असा संदेश आला.


आपल्याच नावाने आलेला हा मसेज पाहून शेख अतिक शेख आयुब यांनी तातडीने बदनापूर पोलीस ठाणे गाठले. व्हॉटसअँपवर अशा प्रकारे मॅसेज करून अज्ञात आरोपीने अब्रुनुकसान केली अशी तक्रार त्यांनी दाखल केली. त्यांनी तक्रारीवरून बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सायबर सेल पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस तपासादरम्यान हा मॅसेज आंध्रप्रदेशमधून आल्याचं समोर आलंय.