सांगली : इस्लामपूर मधील त्या चार कोरोना बधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत २५ पैकी ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर या शिवाय त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य 10 जणांचे रिपोर्ट ही निगेटिव्ह आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदी अरेबियामधून इस्लामपूरमध्ये आलेल्या एकाच कुटुंबातील दोन महिला आणि दोन पुरुष हे कोरोना बाधित झाले होते. त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असुन चोवीस तासानंतर परत त्यांची टेस्ट केली जाणार आहे. त्यातही रिपोर्ट निगेटिव्ह रिपोर्ट आला तरी त्या रुग्णांना होम कोरोन्टाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. पूर्णपणे होम कोरोन्टाईन अनिवार्य असणार आहे.



त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य दहा जणांचे रिपोर्ट ही निगेटिव्ह आले आहेत. या रुग्णांना इन्स्टिट्यूशनल कोरोन्टाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं.


बाळाला कोरोना


कल्याण-डोंबिवलीत  कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज कल्याण-डोंबिवलीत ३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या ३ रुग्णांमध्ये एका ६ महिन्याच्या चिमुरड्याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. तसेच ६० वर्षीय आजीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज २४ वर पोहचली आहे.