Jalna Crime News : शिक्षक हे समाज घडवण्याचे काम करत असतात. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य एका शिक्षकाने केले आहे. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं आहे. जालना येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  संतप्त ग्रामस्थांनी संस्थाचालकाला जाब विचारत शाळेला ठोकलं कुलूप. तसेच जो पर्यंत विद्यार्थीनी पालकांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत शाळा सुरु होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा देखील ग्रामस्थांनी घेतला आहे (Jalna Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना जिल्ह्यातल्या ढासला गावात हा प्रकार घडला आहे. बदनापूर तालुक्यातील ढासला गावात सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये हा शिक्षक कार्यरत आहे.  महेंद्र साठे असे या शिक्षकाचे नाव आहे. साठे या शिक्षकाने इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याचा आरप केला जात आहे. याची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी शाळा गाठत मुख्याध्यापक आणि संस्थाचालकाचा याचा जाब विचारला. त्याचबरोबर शाळेला कुलूप ठोकत आरोपी शिक्षकाला अटक होत नाही तसेच मुलीला जोपर्यंत पालकांच्या ताब्यात परत देत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नसल्याची भूमिका घेतली. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात तणावाचे वातावर निर्माण झालेय. नागरिकांनी शाळेतच ठिय्या मांडला.


NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलींची आत्महत्या


गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका मुलीने आत्महत्या केली आहे. सलोनी गौतम (वय 17 वर्षे)  असे या या मुलीचे नाव आहे.  नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून तिने साडीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. NEET परीक्षेच्या निकाल रात्री उशिरा लागला . घरातील सर्व झोपी गेले होते.


नीट परीक्षेत सलोनीला कमी गुण मिळाले त्यामुळे नैराशतून तिने रात्रीच्या सुमारास साडेतीन वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांना समुपदेशनाची नितांत गरज असल्याचे यावरून स्पष्ट होते. NEET बोर्डाने सुद्धा दिवसा रिजल्ट दिलेलं चांगलं जेणेकरून मुलांवर पालकांना लक्ष देण्यास मदत होईल अशी मागणी नागरिक करत आहेत. उच्च स्तरीय तपासणी साठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे नेण्यात आलं असून या घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.