बाबासाहेब म्हणजे सर्वांना मोहून टाकणारं रसायन; `जाणता राजा`मधील कलाकारांचा बांध फुटला
ते शिस्तही लावत होते...
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन झाल्याचं वृत्त कळताच कलाकार, नेतेमंडळींनी त्यांच्या निवासस्थानाच्या रोखानं प्रवास सुरु केला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचं दु:ख त्यांच्यासोबत काम केलेल्या कालकारांना सर्वाधिक झाल्याचं पाहायला मिळालं.
'जाणता राजा' या महानाट्यासाठी बाबासाहेबांसोबत काम करणाऱ्या कलाकारांनीही यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
'जाणता राजा' या महानाट्यामध्ये छत्रपतींची भूमिका साकारलेल्या आणि ती भूमिका जगलेल्या कलाकारानं बाबासाहेब म्हणजे एक वेगळं आणि सर्वांचं मन मोहून टाकणारं रसायन होतं अशी प्रतिक्रिया दिली.
'बाबासाहेब म्हणजे अतीशय संथ वृत्तीचा माणूस. कोण काहीही मागेल ते बाबासाहेब देत होते. एका बाजूनं ते सर्वांवर प्रेम करायचे आणि ते शिस्तही लावत होते', अशा शब्दांत कलाकारांनी भावना व्यक्त केल्या.
'जाणता राजा', हे नाटक नसून ही एक महापूजा आहे आणि कलाकार रुपात आपण सेवेकरी आहोत असं म्हणत कायमच प्रयोग हा त्याच ताकदीचा व्हायला हवा यासाठीच बाबासाहेब आग्रही असायचे असं म्हणत कालकारांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या. यावेळी आपला आधार गमावल्याचं म्हणत काही कलाकारांच्या अश्रूंचा बांधही फुटला.