कोल्हापूर : पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील गुळाचा सौदा काढण्यात आला. गुळाला प्रती क्विंट्ल ५६०० इतका दर मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उसाच्या गळीत हंगामाबरोबर गुळाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे नव्या हंगामातील गुळ कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समीतीत दाखल झाला आहे.


पाडव्याच्या मुर्हुतावर या गुळाचा सौदा काढण्यात आला. यामध्ये सुरवातीच्या गुळाला प्रती क्विंट्ल ५००० रुपये दर मिळाला. त्यानंतर हा दर वाढून ५६०० रुपयांवर पोहचला.


यंदाच्या हंगामात गुळाला मिळालेला हा उंच्याकी दर आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सर्जेराव पाटील यांच्या हस्ते मुहूर्ताचा गुळाचा सौदा काढण्यात आला.


हा मिळालेला दर या पूर्ण हंगामात मिळावा अशी अपेक्षा गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.