जय महाराष्ट्र, जय एकनाथ! भावना गवळी यांच्या नाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
Maharashtra Politics : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत निवडणुकीमध्ये जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी पार पडला.. यावेळी शपथ घेताना भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर, जय महाराष्ट्र, जय एकनाथ असा नारा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत..
Bhavana Gawali : विधान परिषद निवडणुकीत जिंकून आलेल्या सदस्यांचा हा शपथविधी... यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळींनीसुद्धा शपथ घेतली... मात्र शपथ घेतल्यानंतर भावना गवळींनी जय महाराष्ट्र, जय एकनाथ असं म्हटलं.. भावना गवळींच्या या शपथेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या... मात्र आपल्याला संधी दिल्याने पक्षप्रमुखांचं नाव घेतल्याचं स्पष्टीकरण भावना गवळींनी दिलंय. मात्र, एकनाथ म्हणायचं की दोन नाथ हा त्यांचा प्रश्न असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लगावलाय.
भावना गवळी या शिवसेनेच्या खासदार.. 5 टर्म म्हणजेच 25 वर्ष त्या खासदार राहिल्या... यंदाही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून त्या इच्छुक उमेदवार होत्या.. शिवसेनेत फूट पडली तेव्हाही त्या खासदार होत्या.. मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंची साथ दिली होती.. त्यामुळेच लोकसभेतही भावना गवळींनाच तिकीट मिळणार अशीच चर्चा होती. मात्र भाजपकडून विरोध करण्यात आल्याने भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलं.. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तिकीट देण्यात आलं.. मात्र राजश्री पाटील यांना पराभव पत्करावा लागला.. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदेंशी एकनिष्ठ राहिलेल्या भावना गवळी नाराज असल्याची चर्चा सुरु झाली.. त्यानंतर नाराज भावना गवळींचं पुनर्वसन विधान परिषदेची उमेदवारी देऊन करण्यात आली होती. याच कारणाने भावना गवळींनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र, जय एकनाथ असं म्हणत पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंचे आभार मानल्याची चर्चा आहे..
भावना गवळी या शिवसेनेच्या खासदार.. 5 टर्म म्हणजेच 25 वर्ष त्या खासदार राहिल्या... यंदाही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून त्या इच्छुक उमेदवार होत्या.. शिवसेनेत फूट पडली तेव्हाही त्या खासदार होत्या.. मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंची साथ दिली होती.. त्यामुळेच लोकसभेतही भावना गवळींनाच तिकीट मिळणार अशीच चर्चा होती. मात्र भाजपकडून विरोध करण्यात आल्याने भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलं.. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तिकीट देण्यात आलं.. मात्र राजश्री पाटील यांना पराभव पत्करावा लागला.. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदेंशी एकनिष्ठ राहिलेल्या भावना गवळी नाराज असल्याची चर्चा सुरु झाली.. त्यानंतर नाराज भावना गवळींचं पुनर्वसन विधान परिषदेची उमेदवारी देऊन करण्यात आली होती.. याच कारणाने भावना गवळींनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र, जय एकनाथ असं म्हणत पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंचे आभार मानल्याची चर्चा आहे..