खबरदार..झाडं कापाल तर व्हाल गजाआड
अवैध वृक्षतोड करणाऱ्यां विरोधात पोलिस तक्रार,महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश
नागपूर- राज्याच्या उपराजधानीत शकडो झाडांवर अवैध कु-हाड चालवली जाते.याबाबत झी 24 तासनं सातत्यानं प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे.आता शहरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीविरोधात मनपाने कठोर पाउल उचलले आहे. अवैधरित्या झाडांच्या फांद्या तोडणे,वृक्ष तोड करणाऱ्यांविरोधात नागपूर महानगरपालिकेतर्फे पोलिस तक्रार करण्यात येणार आहे. यासंबंधी महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहे.ज्या प्लॉटमध्ये व इतर ठिकाणी अवैधरित्या वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यांच्याविरोधातही पोलिस तक्रार करण्याचे निर्देश त्यांनी दिलेय.तसेच महापालिकेच्या उपद्रव शोध पथक सुध्दा याबद्दल कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूरची ग्रीन सिटी म्हणून देशात वेगळी ओळख आहे.नागपूर शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नागपुरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला झाडांची लागवड करण्यात आलीय.मात्र वृक्षाची अवैध कटाई करणाऱ्या टोळी मार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची तक्रार पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या ग्रीन व्हिजील फाउंडेशनतर्फे महापौर कार्यालयात करण्यात आली. याबाबत महापौरांनी ग्रीन व्हिजिल फाउंडेशन आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आढावा घेतल्यानंतर महापौरांनी अवैधरित्या वृक्षांची कटाई करणाऱ्या टोळीसह अवैधरित्या वृक्षांची कटाई करून घेणाऱ्या प्लॉटधारकाच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
शहरात पाच वर्षात 5 हजारांपेक्षा जास्त झाडे कापली
गेल्या पाच वर्षात शहरात ५ हजार २७४ झाडं कापण्यात आल्याच वास्तव माहिती अधिकारात उघडकीस आले आहे. त्यामुळं पर्यावरणाच्या दृष्टीनं घातक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळं अवैध वृक्ष तोडीच्या दृष्टीनं आता प्रशासनं आता
कठोर पाऊलं उचलणे महत्वाचे होते.