ठाणे : सिमीचा कार्यकर्ता आणि पहिला उच्च शिक्षित दहशतवादी म्हणून कुप्रसिद्ध ठरलेला साकेब नाचनची आज ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झालीय.


१० वर्षांची शिक्षा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००२-०३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटच्या खटल्यात साकेब आरोपी होता. याप्रकरणात साकेबवर अवैध शस्त्रसाठा केल्याचा आरोप सिद्ध झाला होता. त्यानंतर कोर्टानं त्याला १० वर्षाची शिक्षा सुनावली.


वेळेआधीच सुटका


पण तुरुंगातील चांगल्या वर्तनामुळे त्याची चार महिने आधीच सुटका करण्यात आलीय. पुढचं आयुष्य कुटुंबासोबतच काढण्याची इच्छा त्यानं सुटकेनंतर व्यक्त केली.


तीन बॉम्बस्फोटांत सहभाग


साकीब नाचण व त्याच्या साथीदारांनी गोध्रा हत्याकांड आणि बाबरी मस्जिदचा सूड म्हणून २००२ ते २००३ या वर्षभरात एकूण तीन बॉम्बस्फोट केले होते.


२७ जानेवारी २००३ ला सीएसटीहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकलमध्ये आणि विलेपार्ले येथे मार्केटमध्ये बॉम्बस्फोट केले होते. तर ६ डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वेच्या इमारतीतील मॅकडॉनल्ड रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या बॉम्बस्फोटात १२ जण ठार आणि १४१ जण जखमी झाले होते.