जालना : माळरानावरील एका वस्तीवर शिरलेल्या बिबट्याने दोन जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलंय. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान हा बिबट्या एका लोखंडी जाळीच्या शेडमध्ये अडकला आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यानंतर काही काळात बिबट्याला पकडण्यात यश आलं.


नामदेव गाडेकर आणि आत्माराम पाटील अशी या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावं आहेत.