जळगाव : जिल्ह्यात भाजपमधील दोन गटांमधील वितुष्ट संपता संपत नाही, असेच चित्र दिसून आले. आज झालेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री महाजन यांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येणे टाळले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जलसंपदामंत्री गिरीश महाजन बैठकीला येण्याआधीच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी बैठकीतून काढता पाय घेतल्याने उलटसुलट चर्चेचा उधाण आले आहे. खडसे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केल्यांनतर या बैठकीत खडसेंना मंत्रिमंडळात परत घ्यावे, असा ठराव माजी आमदार डॉ. बी. एस.पाटील यांनी मांडला, यावेळी  प्रचंड गोंधळ झाला. 


खडसे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात यावेळी  घोषणाबाजी केली. त्यानंतर खडसे या बैठकीतून बाहेर पडले. त्यांनतर गिरीश महाजन बैठकीला पोहोचले. दरम्यान, य यावेळी लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणेच आपल्याला पक्षाच्या पाठीमागे राहून कार्य करावे लागणार आहे, असे वक्तव्य करून खडसेंनी त्यांच्या मंत्रिमंडळ वापसीवर स्वतःच प्रशचिन्ह निर्माण केले आहे.