विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : अखेर जळगावातील नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश आलं आहे. वरखेड गावाजवळ बिबट्याचा शार्प शूटरने अचूक वेध घेत,  अखेर नाईलाजाने त्याला ठार मारले आहे, या बिबट्याला दिसताचक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश होते.


७ जणांचा बळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावाजवळ या बिबट्याला ठार मारण्यात यश आल्याचं सांगण्यात येत आहे. या बिबट्याने आतापर्यंत ७ जणांवर हल्ला करून बळी घेतला होता.


महिलेवर पहिला हल्ला


चाळीसगाव तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून शेतात मजुरांनी तसेच शेतकऱ्यांनी जाणे बंद केले होते. सर्वात आधी कापूस वेचणाऱ्या एका महिलेवर या बिबट्याने हल्ला करून ठार केले होते.


वरखेडजवळ घेतला बिबट्याचा वेध


शनिवारी रात्री १०.४५ वाजता, या बिबट्याला गोळ्या घालण्यात आल्या. हैदराबादच्या शार्प शूटरने बिबट्याला गोळ्या घातल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याला अजून दुजोरा मिळालेला नाही. 


परराज्यातून शार्प शूटर


गुजरात, तसेच कर्नाटकातूनही शार्प शूटर बिबट्याला शूट करण्यासाठी चाळीसगावात दाखल झाले होते.


दहशत संपली


बिबट्याा ठार मारल्याची बातमी आल्यानंतर शेतकरी आणि शेतमजुरांमधील बिबट्याची दहशत संपली आहे.