जळगाव : जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात मध्य रात्रीच्या सुमारास झालेले मुसधार पावसाने डोंगरी आणि तीतुर नदीला आलेल्या पुरात सातशे ते आठशे जनावरे आणि पाच ते सात माणसे वाहून गेल्याची भीती आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे तितुर आणि डोंगरी नदीच्या पुराच पाणी पंधरा गावात शिरल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अहाकार उडाला असल्याचं पाहायला मिळाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यातील अनेक गावांचा मध्ये अचानक मोठ्या प्रमाणत पाणी शिरल्याने मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी असलेल्या जनतेला करावा लागला आहे. अनेक गावात घराच्या समोर बांधलेली शेकडो जनावरे आणि काही नागरिक वाहून गेल्याची भीती आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली  आहे. रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. 



अद्यापही चाळीसगाव तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने शहराच्या अनेक भागात आणि अनेक गावात पाणी शिरले असल्याने या ठिकाणचं जनजीवन विस्कळित झाले आहे. चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून वाहने अडकून पडल्याने त्यांना मोठ्या अडचणी ना समोर जावे लागत आहे,एक ट्रक दरीत कोसळत त्यात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आमदार मंगेश चाव्हण यांनी दिली आहे.