जळगावमधलं जिल्हा सरकारी रुग्णालयच आजारी पडलंय...
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची निघा राखण्यासाठी असलेल्या जळगावमधलं जिल्हा सरकारी रुग्णालयच सध्या आजारी पडलंय
जळगाव : सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची निघा राखण्यासाठी असलेल्या जळगावमधलं जिल्हा सरकारी रुग्णालयच सध्या आजारी पडलंय. नुकत्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झालेल्या या जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून मृतदेह ठेवण्यासाठीचा शवागार कक्ष बंद आहे.. त्यामुळे शवविच्छेदन केलेले मृतदेह ठेवायचे कुठे असा प्रश्न रुग्णालय प्रशासपुढं आहे.