जळगाव : जळगाव महापालिकेत आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, एकूण ७५ जागांपैकी भाजपला ५७ जागांवर आघाडी मिळालीय. शिवसेना दुसऱ्या जागेवर आहे. शिवसेनेला १४ जागांवर आघाडी मिळालीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भोपळाही फुटलेला दिसत नाही. इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निकालामुळे गेल्या अनेक वर्ष चर्चेतलं व्यक्तीमत्व राहिलेल्या सुरेश दादा जैन यांना मोठा धक्का बसलाय. सुरेशदादांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचं या निवडणुकीतून दिसून येतंय. गेल्या ३५ वर्षांपासून जळगावात सुरेशदादांचंच वर्चस्व होतं. पण, गेल्या काही वर्षांपासून जळगावचा विकास खुंटलेला दिसून येत होता, असं जाणकारांचं म्हणणं दिसून येतंय. 


तर गिरीश महाजनांचा मोठा विजय होण्याची चिन्हं दिसतायत. या निवडणुकीसाठी त्यांनी मोठी व्युहरचना रचली होती... गेल्या काही महिन्यांपासून ते इथंच तळ ठोकून बसले होते... 


शिवसेना मात्र या निवडणुकीत स्वबळावर उतरली होती. शिवसेन सध्या १४ जागांवर आघाडीवर आहे.