Jalgaon: जळगावमध्ये पाणीपुरी खाणं नागरिकांना चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलं आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव याठिकाणी पाणी पुरी खाल्ल्याने नागरिक आजारी पडल्याची घटना घडली आहे. कमळगावच्या आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्रास झाल्यानंतर रूग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगाव इथल्या रुग्णांचां समावेश आहे. यावेळी पाणी पुरी खाल्यानंतर रूग्णांना सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास सुरु झाला आहे. 70 पैकी 30 रुग्ण चोपडा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येतंय. याशिवाय तसंच इतर रुग्ण खासगी आणि जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय. तर 10 रुग्णांवर चोपड्याच्या अडावद येथे उपचार सुरू आहे. 


रूग्णांना अडावद प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी भरती करण्यात आलंय. यामध्ये लहान बालकांपासून वयोवृद्ध नागरिकांच्या समावेश आहे. बाधित नागरिकांना उलटी मळमळ पोटदुखी  होत असल्याचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी पाणीपुरी खाल्ल्याचं समोर आलं आहे.  


या रुग्णांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर सागर पाटील, डॉक्टर पवन पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले आहे. रुग्णालयात रुग्ण ऍडमिट झाले त्यावेळेस संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडित असल्याने डॉक्टरांनी या परिस्थितीत उपचार करावा लागला होता. तसंच रुग्णालयात वीज नसल्याने रुग्णांना अंधारातच उपचार घ्यावे लागले. महावितरणच्या 


यावेळी डॉक्टर पवन पाटील यांनी रूग्णांविषयी माहिती देताना म्हणाले, सदर रुग्ण यांना फूड पॉईझन झालं आहे. या रूग्णांवर प्राथमिक उपचार केले आहेत.