वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बोडवढ तालुक्यातील एनगाव ग्रामपंचायतीचे चौदाव्या वित्त आयोगाचे लेखा परीक्षण करण्यासाठी दोन दिवस पूर्वी नाशिक इथल्या पथक जळगाव जिल्ह्यात आले होतं. पण हे पथक सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमधून आलेल्या पथकातील तीन अधिकाऱ्यांनी एनगाव ग्रामपंचायतीचं लेखा परीक्षण गावातील एका खोलीत बसून केलं. पण या अधिकाऱ्यांनी लेखापरीक्षण चक्क चड्डी बनियानवर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांचे चड्डी-बनियानमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 


एनगाव ग्रामपंचायतीचं 14 वं वित्त आयोगाचं लेखा परिक्षण करण्यासाठी नाशिकचे तीन अधिकारी बोदवड गावात आले होते. ग्रामपंचायतींने अधिकाऱ्यांना त्यांचं काम करण्यासाठी एक घर दिलं. मात्र लेखा परीक्षण करताना हे अधिकारी चक्क चड्डी आणि बनियानवरच बसले होते. 


जिल्ह्यात सध्या या प्रकाराची चांगली चर्चा रंगली आहे. या घटने संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे तक्रार प्राप्त झाली असून त्या संदर्भात योग्य ती चौकशी कडून कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटल आहे