जालना : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होत आहे. जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात रस्सीखेच पहायला मिळतेय. 56 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता असून सेनेचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सध्या जिल्हा परिषदेत भाजपचे 22,राष्ट्रवादीचे 13, काँग्रेसचे 5 शिवसेनेचे 14 आणि 2 अपक्ष अशी सदस्य संख्या आहे. मात्र राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळे जिल्हा परिषदेत पुन्हा महाविकास आघाडी बाजी मारणार की भाजप? याकडे सर्वांच्या नजरा लागल्यायत. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्य मंत्री यांची गुप्त बैठक झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहे.


या बैठकीत नेमके  काय सुरू आहे हे जरी कळू शकले नाही तरी, या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचा भाजप देखील प्रयत्न करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.