सोलापूर : जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद झालेत. आज पहाटे पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे सीआरपीएफ जवान सुनील काळे शहीद झालेत. दहशतवाद्यांच्या चकमकीत सुनील काळे यांना वीरमरण आले. दरम्यान, सुनील काळे यांनी आज पहाटे ४:३० वाजता दोनअतिरेक्यांना ठार करण्यात महत्वाची भूमिका बजावली.


पुलवामात दोन दहशतवाद्यांचा खात्मा



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफ जवान सुनील काळे हे शहीद झालेत. मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील बंडजू भागात सुरक्षा दलाने दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला घेराव घातला. यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी जवान सुनील काळे यांनी चोख पत्त्युतर दिले. 


त्यांनी दोन दहशवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले. या कारवाईच्यावेळी सीआरपीएफचे जवान सुनील काळे हे जखमी झाले होते. त्यानंतर ते शहीद झालेत. दरम्यान, दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसह संयुक्त कारवाई केली.