मुंबई : Dadar - Madgaon Janshatabdi Express engine failure : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील कापसाळ दरम्यान इंजिनात बिघाड झाल्याने बंद पडलेली दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस मार्गस्थ झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र, अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. (Jan Shatabdi engine failure - Konkan Railway resumes traffic)


कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस खोळंबली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात चिपळूणनजीक बिघाड झाला होता. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. ( Konkan Railway delays traffic) रेल्वे बोगद्यातच जनशताब्दी बंद पडली. त्यामुळे दुसरे इंजिन येईपर्यंत गाडी एकाच ठिकाणी अडकून पडली होती. सुमारे तीन तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरु करण्यात यश आले.



दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचे ( Dadar- Madgaon Jan Shatabdi Express) बिघडलेल इंजिन काढून दुसरे इंजिन बदलले आणि गाडी रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. या गाडीमुळे अडकलेक्या इतर गाड्या आणि थांबविण्यात आलेल्या सगळ्या गाड्या हळूहळू मार्गस्थ झाल्या आहेत. जनशताब्दी गाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने खोळंबा झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झालेत. दरम्यान, अनेक तास खोळंबा झाल्याने प्रवासी संतप्त झाले होते.