सातारा - सातारा जिल्हा सहकारी बँकेला अंमलबजावनी संचालनालयाकडून (ED) नोटीस पाठवण्यात आली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्ज प्रकरणाची होणार चौकशी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जरंडेश्वर ला सातारा जिल्हा बँकेने 2017 मध्ये 96 कोटीचे कर्ज कारखान्याला दिले होते. जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने राजकीय चर्चांना उधान आलं आहे. पुणे जिल्हा बँकेसह चार बँकांनी कारखान्याला कर्ज दिले होते. त्यात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग होता. 


ईडी कडून आलेल्या नोटीसी बाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खुलासा केला आहे. जरंडेश्वर कारखान्याला 137 कोटी रुपयांचे कर्ज नियमानुसारच दिले आहेत. कारखान्याकडून 96 कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी आहे.


काय आहे प्रकरण?
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. 


ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना आणि मशिनरी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.