जायकवाडीतून औरंगाबाद आणि जालन्याचं पाणी बंद करण्याची नोटीस
जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा करणाऱ्या औरंगाबाद महापालिका, जालना आणि पैठण नगरपरिषदचे पाणी बंद करण्याची नोटीस जायकवाडी पाट बंधारे विभागाने संबंधितांना दिली आहे.
औरंगाबाद : जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा करणाऱ्या औरंगाबाद महापालिका, जालना आणि पैठण नगरपरिषदचे पाणी बंद करण्याची नोटीस जायकवाडी पाट बंधारे विभागाने संबंधितांना दिली आहे.
जवळपास ११ कोटी रुपयांची थकबाकी असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात येत आहे. तसंच ही रक्कम तात्काळ नाही भरली तर पाणी पुरवठा तोडण्यात येणार आहे. औरंगाबाद महापालिका कडे ८ कोटी ५८ लाख, जालना कडे दीड कोटींवर, तर पैठणकडे ७४ लाखांवर थकबाकी आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने पत्र व्यवहार सुद्धा केला.
मात्र थकबाकी काही कुणी भरली नाही. त्यामुळे आता जायकवाडीतुन होणार पाणी पुरवठा बंद होण्याची चिन्ह आहेत. आधीच कच-याच्या प्रश्नांनी हैराण झालेल्या औरंगाबादकरांसमोर आता पाण्याचंही संकट उभं राहणार की काय अशी शंका व्यक्त होतेय.