शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर; शेअर केला भाषणाचा `तो` Video
Jayant Patil On Narendra Modi : शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा जाहीर प्रश्न नरेंद्र मोदी यांनी शिर्दीच्या सभेत विचारला. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी मोदींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर (Maharastra Politics) दिलंय.
Maharastra Politics : शिर्डीतील (Shirdi) जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. माजी कृषीमंत्री राहिलेल्या पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत केला. मी पवारांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? अशी विचारणा मोदींनी (Narendra Modi) केली. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ देखील शेअर केला.
पंतप्रधान मोदी राष्ट्र बळकटीचं काम करत आहेत. म्हणून विकासाचा हाच धागा पकडून आपण भाजसोबत गेल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं. शिर्डीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी मोदींचं कौतूक केलं. मात्र, मोदींनी अजित पवारांसमोर काका शरद पवार यांना टोला लगावल्याने राजकीय वर्तुळात (Mahrastra Politics) चर्चेला उधाण आलं आहे.
किती हा विरोधाभास, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं जयंत पाटील म्हणतात.
पाहा Video
2024 मध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. मोदी पंतप्रधान होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं शिंदेंनी शिर्डीतील जाहीर सभेत बोलताना सांगितलं. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. कितीही लोकं एकत्र आले तरी इंडिया आघाडी मोदींचं काहीच बिघडवू शकत नाही, असा हल्लाबोल शिंदेंनी केला.
दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून भाविकांची लवकरच सुटका होणार आहे. तिरूपतीच्या धर्तीवर 110 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या साई मंदिराच्या अत्याधुनिक दर्शन रांगेच आज पंतप्रधानांकडून लोकार्पण होणार आहे.