Kolhapur News : हातकणंगलेची लढाई अन् शेट्टींची तयारी, लँचिंगच्या तयारीत असलेल्या पाटलांचं काय होणार?

Hatkanangle Assembly Constituency : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे कोल्हापुरातील (Kolhapur News) हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. काय आहे या मतदारसंघाची स्थिती? पाहुयात...

सौरभ तळेकर | Updated: Oct 26, 2023, 08:34 PM IST
Kolhapur News : हातकणंगलेची लढाई अन् शेट्टींची तयारी, लँचिंगच्या तयारीत असलेल्या पाटलांचं काय होणार? title=
Kolhapur Hatkanangle Assembly Constituency

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे एकाएकी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातली समीकरणं बदलीयेत. हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangle Assembly Constituency) तर आता थेट तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने खासदार आहेत. राजू शेट्टींचा (Raju Shetty) पराभव करत ते खासदार बनले. त्यामुळे राजू शेट्टी याच मतदारसंघातून कमबॅक करण्याची तयारी करतायत. मात्र ठाकरे गट शेट्टींना जागा सोडेल का पेच आहे. दुसरीकडे या मतदारसंघातून जयंत पाटील (Jayant Patil) आपल्या मुलाला लाँच करण्याच्या तयारीत आहेत. महायुतीत धैर्यशील मानेंना (Dharyashil Mane) उमेदवारी मिळेल का याबाबतही संभ्रम आहे. हातकणंगलेत तिहेरी लढत होण्याची शक्यता का आहे पाहुयात..

हातकणंगलेत तिहेरी लढत का? 

शिंदे गटाचे धैर्यशील माने सध्या या मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आघाडीधर्मानुसार शिवसेनेला जागा सुटणार असं पहायला मिळतंय. तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे राजू शेट्टी यांचा पराभव करत निवडून आलं. त्यामुळे आता शेट्टींसाठी ठाकरे गट जागा सोडणार का? हा पेच निर्माण झालाय. ठाकरे गटानं जागा सोडली नाही तर शेट्टी इंडिया आघाडीशी फारकत घेत स्वबळावर लढतील हे निश्चित. त्यामुळे नेमका कोणता निर्णय होतोय, यावर सर्वांचं लक्ष असेल. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील या जागेसाठी उत्सुक आहे. 

हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील हे पुत्र प्रतिक पाटील यांना लाँच करण्याच्या तयारीत आहेत. महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटेल मात्र मानेंविरोधात मतदारसंघात नाराजी कायम राहिल. त्यामुळे भाजपकडून बॅकअप प्लॅनची तयारी सुरु असल्याची सुत्रांची माहिती समोर आलीये. त्यामुळे महायुती विरुद्ध इंडिया विरुद्ध राजू शेट्टी अशी लढत होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा - Maharastra Politics : मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे हातकणंगलेत उमेदवारी कुणाला याची चुरस आहे. विशेष म्हणजे ही चुरस महाविकास आघाडीतच आहे. हातकणंगलेवर ठाकरे गटाचा दावा आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटालाही ही जागा हवीय तर नुकतेच इंडिया आघाडीत सामील झालेले राजू शेट्टीही इथूनच कमबॅक करु इच्छितायत. त्यामुळे मविआत हा मतदारसंघ कुणाला सुटतो यावर इथली लढत दुहेरी होणार की तिहेरी हे अवलंबून आहे. लढत तिहेरी झाली तर इंडिया आघाडीला याचा नक्कीच फायदा होईल, अशी चर्चा देखील आहे.