मंत्री महोदयांनीच फायदा मिळवण्यासाठी जमीन खरेदी केली?
२ हेक्टर शेती खुद्द पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनीच खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धुळे : विखरण येथील औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमीन अधिसूचित करण्यात आल्यानंतर एका शेतकऱ्याकडून, २ हेक्टर शेती खुद्द पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनीच खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आर्थिक फायद्यासाठी जमीन खरेदी?
आर्थिक फायदा मिळवण्यासाठी जमीन खेरदी केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यानंतर तीन वर्षांनी ही जमीन खरेदी कऱण्यात आली. मुख्य म्हणजे खरेदी व्यवहार झाल्यानंतर सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस निघाली.