उत्साहात साजरा करा व्हॅलेन्टाईन डे - जिग्नेश
मुंबई : जाती-पातीची बंधनं तोडण्यासाठी १४ फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे साजरा करायला पाहिजे, असा अजब सल्ला गुजरातमधले दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवानी यांनी दिला आहे. जात-पात विसरून आंतर जातीय विवाह होणं आवश्यक आहे. त्यासाठी जेवढ्या उत्साहात १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते तेवढ्याच उत्साहात व्हॅलेंटाईन डे साजरा व्हायला हवा, असं मेवानी म्हणाले. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या मानवाधिकार परिषदेत ते बोलत होते.