मुंबई : शेतकऱ्यांच्या मोर्चावर 'माओवादा'चा शिक्का मारणाऱ्या भाजप खासदार पुनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुनम महाजन यांनी कष्टकऱ्यांची टिंगल केली, असं म्हणतानाच माओवाद वगैरे विषय पुनम महाजन यांच्या बुद्धीपलिकडचा विषय आहे, त्यांना त्यातलं काही समजणार नाही... अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी महाजन यांच्यावर टीका केली. 


इतक्यावरच थांबतील ते आव्हाड कसले... 'नखांची निगा राखण्यासाठी पुनम महाजन जेवढा खर्च करतात... तेवढ्या पैशांवर आमच्या आदिवासी महिला संसार चालवतात... नखांची निगा राखण्यासाठी पुनम महाजन ताजमध्ये जातात... त्यांनी या गोष्टीबद्दल बोलू नये' असंही आव्हाड यांनी म्हटलंय.


'शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यच आहेत, मात्र यानिमित्तानं आंदोलनातून शहरी माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल’ असं वक्तव्य करत महाजन यांनी शेतकरी मोर्चावर माओवादाचा शिक्का मारला होता.