Jitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!
Jitendra Awad New opposition leader: जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Jitendra Awad New opposition leader: अजित पवार (Ajit pawar) यांनी थेट शरद पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल झाल्याचं दिसतंय. जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
पक्षातील सर्व आमदारांना माझाच व्हिप लागू होणार. मी शरद पवारांना सोडून कुठेही गेलो नसतो. शरद पवारांनी इतकी पदं देऊन सुद्धा वेगळी भूमिका घेतली. सरकारसोबत जाण्यासाठी मला कोणीही विचारलं नाही. मी मेलो तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही. जे आमदार सोडून गेले त्यांच्या मतदारसंघात संताप व्यक्त केला जातोय. 6 तारखेच्या बैठकीत आमदारांनी चर्चा करायला हवी होती. पक्ष आणि चिन्ह कोणीही घेऊ शकत नाही. शरद पवारांना अशा परिस्थितीत आणणं ही वाईट गोष्ट आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
अनेकांचे नातेवाईक फोन करुन सांगत आहेत की, आम्ही त्यांना समजावतोय सरकारसोबत जाण्यासाठी मला कोणीही विचारलं नाही. माझे व्हीप त्यांना बंधनकारक राहतील अवघड स्थितीकडे संधी म्हणून पहावं लागेल, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला ही माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळाली. कारण आमच्याकडे राजीनामा दिलेला नाही, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. कदाचित राजीनामा द्यायचा असेल तर तो द्यायचं ठिकाण अध्यक्षांकडे आहे. तो राजीनामा बहुतेक विधानसभा अध्यक्षांकडे गेला असेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.