Jitendra Awhad Resignation: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा
आव्हाडांनी पीछेहाट नाहीच, जयंत पाटलांकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा
NCP MLA Jitendra Awhad Resign After molestation case : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आव्हाडांनी आपला राजीनामा दिला. पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी, पोलिसांनी आपली बुद्धी घाण ठेवली असून कोणाच्या सांगण्यावरून ते काम करत असल्याचा गंभीर आरोप पाटलांनी केला आहे. (NCP MLA Jitendra Awhads resignation latest marathi news)
खालच्या स्तराचे आरोप झाल्याने आव्हाड व्यथित झाले आहेत. पोलीससुद्धा कायद्याने वागत नाहीत. आव्हाडांनी माझ्याकडे राजीनामा सोपवला असून त्याबाबतचं पत्र मला दिलं आहे. लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ती क्लिप पहावी कारण विनयभंग झाल्याचं कुठे दिसत नाही. मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
नेमकं काय आहे प्रकरण-
भाजपच्या महिला पदाधिकारीला ढकलल्याचा (Woman Molestation Case) आरोप करण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. जितेंद्र आव्हाड हे गर्दीतून सुरक्षा रक्षकांसमवेत जात होते. यावेळी समोरुन एक महिला त्यांच्यासमोर आली. त्यावेळी त्यांना बाजुला केले. त्यानंतर या महिलेने विनभंगाचा आरोप केला आहे. त्यानंतर आव्हाडांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप (Woman Molestation Case) आव्हाड यांच्यावर केला आहे. त्यामुळे आव्हाड हे वादात सापडले आहेत. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आव्हाड हे व्यथित झाले आहेत. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे, आपल्याविरोधात पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
त्याआधी आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. आपल्याविरोधात 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याने आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.