India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, 44 हजार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; कसा भरायचा अर्ज?
India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा अन् नोकरी मिळवा.
India Post GDS Recruitment 2024 Notification: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गूड न्यूज आहे. पोस्टात 10 वी पास असलेल्या तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी 44,228 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. इंडिया पोस्टने एका अधिसूचनेद्वारे याची माहिती दिली. त्यामुळे आता तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज कसा करायचा? अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व माहिती
तुम्ही जर दहावी पास असाल तरच तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करता येईल. या भरती अंतर्गत तब्बल 44 हजार 228 रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावा लागेल. ही भरती विविध राज्यांमध्ये सुरू होणार आहे. भरतीसाठी indiapostgdsonline.gov.in यावर ऑनलाइन अर्ज केले जातील. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट असल्याने तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.
पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावे, अशी या पदासाठी अट आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर पूर्व, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तमिलनाडु, तेलंगाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात नियुकत्या होणार आहेत.
दरम्यान, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, OBC श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
कसा करायचा अर्ज?
सर्वप्रथम indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या. त्यानंतर अर्जदाराला प्राथमिक माहिती भरावी लागेल. त्यानंतर नोंदणी क्रमांक आल्यानंतर पासवर्ड तयार करून घ्या. तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर तुम्ही पुढील अर्ज भरू शकता. आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला शुल्क भरायचं आहे. त्यानंतर अर्ज सबमिट करा. त्यानंतर तुम्ही अर्ज डाऊनलोड करू शकता.