नागपूर : राज्याची उपराजधानी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. नागपुरात पत्रकाराची आई आणि मुलीची हत्या करण्यात आलीय. उषा कांबळे आणि नात राशी कांबळे असं मृतांची नावे आहेत. मृत हे नागपूरचे स्थानिक न्यूज पोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलगी आहे. 


रविवारी सकाळी दोघींचे मृतदेह सापडले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवार संध्याकाळपासून दोघीही बेपत्ता होत्या. मात्र रविवारी सकाळी दोघींचे मृतदेह नागपूर-उमरेड रस्त्यावरील विहीरगाव परिसरातील नाल्याखाली आढळून आले. या दोघींचे अपहरण करुन दोघींची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. 


लवकरात लवकर अटक करण्याची मागणी


एका पत्रकाराच्या आईचा आणि चिमुकल्या मुलीच्या खुनाच्या या घटनेने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येतेय.