पुणे : बैलगाडा शर्यत हा पुरुषांचा खेळ असा समज आहे. पण, पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या उंचखडक यात्रेत दीक्षा उर्फ श्रावणी पारवे या दहावीत शिकणा-या मुलीने घाटात धाडसाने बैलगाडा जुंपला. सध्या राज्यभरात दीक्षाच्या धाडसाचं कौतुक होतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील दीक्षाचा व्हिडीओ शेअर केला. त्यांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. ते म्हटले की, शाब्बास गं रणरागिणी! शिवजन्मभूमीच्या मातीतील शेतकऱ्याच्या लेकीही मागे नाहीत! जी मायेनं बैलपोळ्याला पुरणपोळी खाऊ घालते ती घाटात गाडा जुंपण्याची हिंमतही दाखवते! आपल्या जुन्नर तालुक्याची कन्या कु. दिक्षा विकास पारवे हिने बैलगाडा जुंपण्याची हिंमत दाखवली! दिक्षा तू महाराष्ट्रातील शूरवीर महिलांच्या परंपरेला साजेसं काम करून दाखवलंय. तुझ्या धाडसाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.. 


दीक्षाचा व्हिडीओ राज्यभर तुफान व्हायरल होत असून, पाहणारा प्रत्येकजण तिचं कौतुक करीत आहेत. अवघ्या दहावीतल्या दीक्षाने बैलगाडा जुंपला. पण हे करीत असताना तिच्यापेक्षा कितीतरी पट शक्तिशाली बैल अगदी आक्रमकपणे उधळला. 


बैल उधळल्याचे लक्षात आल्यानंतरही दीक्षाने बैलाची वेसण सोडली नाही. वेसण घट्ट पकडत तिने उधळलेल्या बैलाला नियंत्रणात आणले. त्यामुळे तिच्या या धाडसाचं कौतुक सर्वजण करीत आहेत.