प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे शहरात एक अनोखा विवाह सोहळा आयोजित केला होता. हजारो धुळेकरांनी या अनोख्या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली. हा विवाह सोहळा होता हिंदू आणि मुस्लिम जोडपे यांचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे शहरात या लग्न सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, भाजप आमदार जयकुमार रावल, अपक्ष आमदार मंजुळा गावित यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली. 


हिंदू आणि मुस्लिम जोडपे यांचा विवाह एकाच मंडपात करण्यात आला. या लग्न सोहळ्यात हिंदू बांधवांनी मुस्लिम पद्धतीच्या लग्नाचा आनंद घेतला. तर, मुस्लीम बांधवांनी हिंदू पद्धतीने लग्न सोहळा कसा संपन्न होतो याचा अनुभव घेतला.  


धुळे शहरात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा व शांततामय सहजीवन धुळेकरांनी अनुभवावे, यासाठी हा प्रयत्न केला असे या लग्न सोहळ्याचे आयोजक एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी सांगितले.