प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर: 'शरद पवार आपसे बैर नही लेकिन समरजीत घाटगेआपकी खैर नही' असे वक्तव्य पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. इतकच न्हवे तर शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मी अल्पसंख्यांक आहे म्हणून मला टार्गेट करत आहेत असा गंभीर आरोप केलाय. या आरोपानंतर शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि नुकताच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले समरजीत घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना चांगलेच सुनावले आहे.


विधानसभा निवडणुकीतील संघर्षाची चुणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम महाराष्ट्रातील कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण जोरदार तापल्याचे पाहायला मिळालय. अनेक दशके ज्या पवारांचा हात धरून हसन मुश्रीफ यांनी राजकारणाचे धडे गिरवले त्याच हसन मुश्रीफ यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मी अल्पसंख्यांक असल्यामुळे मला टार्गेट केलं जात आहे असं हसन मुश्रीफानी म्हटलंय. इतकंच न्हवे तर शरद पवार आपसे बैर नही लेकिन समरजीत घाटगे आपकी खैर नही असे वक्तव्य करत हसन मुश्रीफानी समरजीत घाटगे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारचा संघर्ष होणार आहे याची चुणूक दाखवली.


तेव्हा तुम्ही अल्पसंख्यांक नव्हता का?


मंत्री हसन मुश्रीफ याचे होम पीच असणाऱ्या कागल मधील गैबी चौकात सभा घेत शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवत लाचारांना थारा देऊ नका असं वक्तव्य केलं.. घरची महिला स्वाभिमानीची भाषा करत असताना तुमचा नेता लाचार झाला असं वक्तव्य पवारांनी केले. शरद पवारांचे हेच वक्तव्य मुश्रीफाच्या चांगलंच जिव्हारी लागलाय. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी शरद पवार याच्यावर जातीवाचक आरोप केले. हसन मुश्रीफाच्या या वक्तव्यावरून नुकताच शरद पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या समरजीत घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना चांगलेच सुनावले आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व पदे दिली तेव्हा तुम्ही अल्पसंख्यांक होता हे त्याना माहित न्हवत का? असा सवाल घाटगे यांनी उपस्थित केलाय. शरद पवार तुमच्या वडिलांच्या वयाच्या आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप करत घोर पाप केल आहे, त्यामुळे महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका केलीय.


पवारांचा आशीर्वाद


हसन मुश्रीफ हे मला चॅलेंज देत आहेत पण मला त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण कागल, उत्तुर आणि गडहिंग्लजची जनता स्वाभिमानी असल्याचे समरजीत घाटगे यांनी म्हटलंय, इतकी वर्षे शरद पवार साहेब याचा आशीर्वाद तुमच्या मागे होता, आत्ता मला त्याचा आशीर्वाद मिळाला आहे, त्यामुळे मला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही असं देखील समरजीत घाटगे यांनी मुश्रीफ यांना संगितले आहे.


 गैबी चौकात शक्ती प्रदर्शन


खरंतर शक्ती प्रदर्शन करण्याच्या दृष्टीने समरजितसिंह घाटगे यांना कागल मधील गैबी चौक अपुरा वाटत होता..त्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी सभा घेण्याच्या तयारीत होते, पण शरद पवारांनी मात्र पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ऐतिहासिक गैबी चौकातच आयोजित करा असा सल्ला दिला.. त्याला कारणही तसंच होत, कारण याच गैबी चौकातुन शरद पवारांना लाचारी स्वीकारलेल्या नेत्याला बाजूला सारा असं संदेश कागलच्या जनतेला द्यायचा होता.. त्यामुळेच पवारांची ही खेळी हसन मुश्रीफ याच्या टीकेनंतर यशस्वी ठरली असंच म्हणता येईल. कारण इडीच्या छाप्या नंतरही हसन मुश्रीफ यांनी मी अल्पसंख्यांक असल्यामुळे मला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला होता असं शरद पवार राष्ट्रवादी पक्षातर्फे सांगितले जात आहे. एकूणच काय विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत असे असले तरी आतापासूनच कागलचं मैदान जोरदार होणार हे आरोप प्रत्यारोपावरून दिसून येत आहे.