कोल्हापुरात काळभैरव मंदिरात चोरी, सोने-चांदीचे दागिने पळविले
गडहिंग्लजमध्ये असणाऱ्या प्रसिद्ध काळभैरव मंदिरात चोरी झालीय. सोने-चांदीचे दागिने, दानपेट्या आणि इतर साहित्य घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय.
कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये असणाऱ्या प्रसिद्ध काळभैरव मंदिरात चोरी झालीय. सोने-चांदीचे दागिने, दानपेट्या आणि इतर साहित्य घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय.
तीन तरुणांनी मंदिरात घुसून ही चोरी करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मंदिरातील प्रभावळीसह सोन्या चांदीचे दागिनेही चोरट्यांनी नेलेत.
देवाची गदादेखील गायब आहे. गडहिंग्लज पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.