कल्याण : रुग्ण दगावल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. 


कुठे घडली घटना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणजवळच्या वरप गावात राहणा-या रोहित भोईर या तरुणाला काल कल्याणच्या होलीक्रॉस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. मात्र त्याचा मृत्यू झाल्यानं त्याचे नातेवाईक संतापले आणि त्यांनी होली क्रॉस हॉस्पिटलची तोडफोड केली. 


पत्रकाराला मारहाण


या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या स्थानिक पत्रकारालाही त्यांनी लक्ष्य केलं. पत्रकार केतन बेटावदकर यांच्या डोक्यात आणि मांडीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून त्यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, हल्ला करणारे सर्व हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय.