ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वादग्रस्त आयुक्त पी. वेलरासू यांची बदली करण्यात आली आहे. वेलारसु यांनाही कचरा प्रश्न चांगलाच भोवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी वेलरासू यांच्या बदलीची फाईल मंजूर करून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवली आहे. वेलरासू यांनी कल्याण-डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न हाताळताना अत्यंत हलगर्जीपणा दाखवल्याचा त्यांच्यावर आऱोप आहे. 


लोकांनी तक्रार केल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल तर घरे सोडून दुसरीकडे रहायला जा असा अजब सल्ला आयुक्तांनी लोकांना दिला होता. संतप्त झालेल्या कल्याणकरांनी येत्या १९ मार्च रोजी त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी शिवसेना नगरसेवकांबरोबरही वेलरासू यांचा वाद झाला होता. शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं.