कल्याण : कल्याणच्या गौरीपाडा परिसरात एका मद्यधुंद पोलिसाने दोन तरूणांना जबर मारहाण केली. बापू तायडे असं या पोलिसाचं नाव आहे. खडकपाडा पोलीस स्थानकात या मद्यधुंद पोलिसाविरोधात तक्रार करण्यात आलीय. गौरीपाडा परिसरात दोन तरूण इमारतीखाली गप्पा मारत उभे होते. त्यावेळी सोसायटीत राहणारा आणि मद्यधुंद असलेला बापू तायडे हा पोलीस कर्मचारी ड्युटीवर नसताना तरूणांना हटकून चौकशी करू लागला. त्यानंतर त्याने या तरूणांना मारहाण करायला सुरूवात केली. ही मारहाण करताना एकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING