आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : शिवसेनेचे (Shivsena)  माजी आमदार सूर्यकांत देसाई  (Suryakant Desai) यांचा आज मृत्यू झाला. ते डोंबिवलीत (Domibivali) राहात होते. पण धक्कादायक म्हणजे एका रुग्णालयातुन (Hospital) दुसऱ्या रूग्णालयात नेत असताना अॅम्ब्यूलन्स (Ambulance) मध्येच बंद पडल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळाले नाही, अन्यथा त्यांचा जीव वाचू शकला असता असा आरोप देसाई यांच्या कुटुंबियांनी केला आहे. (Shivse EX-MLA Suryakant Desai Death)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकांत देसाई हे 1995 ते 2000 या काळात परळ लालबाग विधानसभा मदारसंघातील आमदार होते. गेली 22 वर्ष ते डोंबिवलीत राहत होते त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्रास आणखी वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देण्यात आला. पण ज्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते तिथं व्हेंटिलेटर ची सुविधा नव्हती. 


त्यामुळे देसाई यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यासाठी अॅम्ब्यूलन्स बोलावली. पण दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना अॅम्ब्यूलन्स रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी चक्क धक्का मारत अॅम्ब्यूलन्स अर्ध्या किलोमीटरपर्यंत पुढे नेली. त्यानंतर तिथे दुसरी एक रुग्णवाहिका बोलवून त्यांना दुसऱ्या खाजगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  दरम्यान या रुग्णवाहिक विरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं देसाई यांच्या कुटुंबीयांनी सांगितले


सूर्यकांत देसाई यांचं आज सकाळी 11.30 निधन झालं, ते 83 वर्षांचे होते. डोंबिवली पश्चिम इथल्या भागशाळा मैदान परिसरातील काशीकुंज नावाच्या इमारतीत ते कुटुंबासह राहात होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना डोबिवली पूर्वेकडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून ते ऑक्सिजनवर होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना अॅम्ब्युलन्स बंद पडली आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला.


सूर्यकांत देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली, सून, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. दरम्यानत रुग्णावाहिका बंद पडल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हलगर्जीपणाची तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं देसाई यांच्या मुलाने सांगितलं.