कल्याण : एलफिन्स्टन स्टेशनवर सकाळी झालेल्या दुर्घटनेने अनेकांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. २२ जणांचा या दुर्घटनेत नाहक बळी गेला. यात कल्याणच्या एका युवतीचा दुर्देवी मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रद्ध वरपे असं या तरुणीचं नाव. नेहमीप्रमाणे ती सकाळी ऑफिसला निघाली. श्रद्धा एल्फिस्टन इथल्या कामगार मंडळ कार्यालयात कामाला होती. नेहमीप्रमाणे ती घरातून निघाली मात्र ती कायमचीच. तिला काय तिच्या घरच्यांनीही कधी कल्पना केली नसेल की आपल्या मुलीचा असा दुर्देवी मृत्यू होईल.


श्रद्धा नेहमीच्या रस्त्याने निघाली होती. यावेळी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत तिचा मृत्यू झाला. श्रद्धाचे वडील किशोर वरपेही येथेच काम करतात. ही दुर्घटना घडली तेव्हा ते घटनास्थळीच होते. मात्र तेथे असूनही त्यांना श्रद्धाचा जीव वाचवता आला नाही. श्रद्धाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.