Kalyan Murder News: कल्याण येथे 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीच्या गावी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला तिथून अटक करण्यात आली. सलूनमध्ये बसला असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस अटक करत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण कोळशेवाडी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलगी संध्याकाळपासून बेपत्ता होती. आरोपीने तरुणीने त्याच्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. नंतर विशालने तिची हत्या करुन तिला मृतदेह बॅगेत भरला. नंतर एका मित्राच्या रिक्षातून मृतदेह नेला आणि बापगाव येथे नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. 


धक्कादायक म्हणजे आरोपी विशाल गवळीचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. पहिल्या सीसीटिव्हीत मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो एका बारमध्ये गेला तिथे तो दारू प्यायला त्यानंतर पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला. मात्र, पोलिसांना विशाल गवळीच्या घरासमोर रक्ताचे डाग पडल्याचे दिसले त्यानंतर त्यांनी त्याची पत्नी साक्षी गवळीला ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा हा सगळा घटनाक्रम उघडकीस आला. 


आरोपी सलूनमध्ये असताना अटक


आरोपी शेगावमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. तेव्हा पोलिसाची पथके रवाना झाली होती. पोलिसांनी आरोपीला सलूनमध्ये असताना अटक केली. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. या व्हिडिओत आरोपी खुर्चीवर बसलेला दिसत आहे. तर मागून दोन पोलिस साध्या वेशात येतात आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 



दरम्यान, विशाल गवळीविरोधात गेल्या तीन चार वर्षात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग प्रकरणी २, मुलाचा लैगिंक अत्याचार प्रकरणी १, जबरी चोरी प्रकरणी १, मारहाण प्रकरणी २ गुन्हे दाखल आहेत. यात आता वाढ होऊन हत्येचा गुन्हा देखील त्याच्यावर नोंदविला गेला आहे. विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचे समोर आले आहे.