कल्याणमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीय शेजाऱ्याकडून हल्ला
Kalyan Rada: पुन्हा एकदा एका परप्रांतीय इसमाकडून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे.
Kalyan Rada: कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या अखिलेश शुक्ला या परप्रांतियाने क्षुल्लक कारणांवरुन अभिजीत देशमुख यांना मारहाण केली होती. यानंतर परप्रांतीय विरुद्ध मराठी हा वाद उफाळून आला. पुढे गृहविभागाने अखिलेश शुक्लावर कारवाई केली. याला 2-4 दिवस उलटत नाहीत तोवर पुन्हा कल्याणमधूनच धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुन्हा एकदा एका परप्रांतीय इसमाकडून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे.
चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास एक महिला आपल्या शेजाऱ्याकडे केली. पण तिच्याशी चर्चा न करता तिच्यासह तिच्या मराठी कुटुंबाला मारहाण झाली आहे. उत्तम पांडे असे मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव आहे. पांडे यांच्या पत्नीनेदेखील मारहाण केली. यानंतर पीडित मराठी कुटुंबाकडून पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मारहाणीत मराठी महिला आणि आईला गंभीर मार लागला आहे. तसेच तिचा पती जखमी झाला आहे. मराठी महिलेचा पती हा पोलीस कर्मचारी आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत.
काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अडीवली येथील रागाई इमारतीमध्ये 2 शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद झाला होता. लहान मुलांच्या खेळण्यावरुन हा वाद झाला होता. यामध्ये 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्याने विनयभंग केल्याची तक्रार तिच्या आईने केली. याचा जाब विचारल्यानंतर मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे. मानपाडा पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.