आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधल्या शहाड बंदार पाडा परिसरात काल संध्याकाळच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत मुलाची ओळख पटली नसल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचं मोठं आव्हान होतं. पण पोलिसांनी एका पुराव्याच्या आधारावर अवघ्या पाच तासाच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरमान सय्यद असा 16 वर्षीय मृत मुलाचं नाव असून तो कल्याणजवळच्या बल्यानी परिसरात आपल्या कुटूंबासह राहत होता. अरमान मोबाईल रिपेरिंगचं करत होता. याच परिसरात शाहरुख शेख राहतो. अरामान आणि शाहरुख हे एकमेकांचे चांगले मित्र होते. 


अरमान आणि शाहरुखच्या एका मित्राने भिवंडीतून एक मुलगी पळवून आणली. काही दिवसांनी ही मुलगी निघून गेली. पण त्या मुलीला शाहरुखने लपवून ठेवल्याचा संशय अरमानला होता. यातून अरमान आणि शाहरुखदरम्यान जोरदार भांडण झालं. 


या भांडणाचा राग मनात धरत अरमानचा काटा काढण्याचा कट शाहरुखने रचला. 24 फेब्रुवारीला अरमानने एका चोरीची गाडी लपवयाची असल्याने शाहरुखला बंदरपाडा परिसरात बोलावून घेतं. या संधीचा फायदा घेत शाहररुखने आपल्यासोबत धारदार शस्त्र नेलं. बंदरपाडा परिसरात या दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं. यावेळी रागाच्या भरात शाहरुखने अरमानवर हल्ला केला. यात अरमानचा जागीच मृत्यू झाला. 


बंदरपाडा परिसरात मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी त्यांना दोन मोबाईल आढळले. मोबाईलच्या आधारे पोलिसांनी अवघ्या पाच तासात शाहरुखला बेड्या ठोकल्या.