भारतात Electric Car/Bike एकदा चार्ज करायचा खर्च किती? खरंच EV परवडते? पाहा आकडेमोड

Cost of Charging an Electric Car And Bike in India: इलेक्ट्रिक कार्स आणि बाईक परवडता, असं आपण अनेकदा ऐकतो. मात्र त्या खरोखरच किती परवडतात? एकदा कार किंवा बाईकची बॅटरी चार्ज करण्यासाठी किती खर्च येतो? भारतात हा खर्च नेमका किती आहे? यासंदर्भात जाणून घेऊयात...

| Sep 21, 2024, 16:27 PM IST
1/10

carcharging

'अरे.. पेट्रोल, डिझेलपेक्षा EV घे! जास्त परवडते आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे,' असा सल्ला तुम्हीही ऐकलाच असेल. पण खरंच भारतामधील विजेचे दर आणि भारतात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक बाईक्स आणि कार एकदा चार्ज करायला किती खर्च येतो माहितीये का? पेट्रोलच्या तुलनेत तो खरंच परवडतो का? याचे गणित समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न....

2/10

carcharging

भारतात सध्या उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक कार्समधील बॅटरीची क्षमता ही 20 ते 40 किलो व्हॅट इतकी असते.   

3/10

carcharging

जेव्हा इलेक्ट्रिक कारची बॅटरी घरी चार्ज केली जाते तेव्हा त्यासाठी लागणारा खर्च हा तुम्ही कोणत्या राज्यात असून कोणत्या कंपनीची वीज वापरता यावर आहे. साधारणपणे भारतभराचा विचार केल्यास हा दर 8 ते 10 रुपये प्रति युनिट इतका येतो.

4/10

carcharging

आता सार्वजनिक ठिकाणी इलेक्ट्रिक कार चार्जिंगची सोय असल्याचं अनेक जागी पाहायला मिळतं. येथील दर किती असतात आणि त्यासाठी किती पैसे मोजावे लागतात ते समजून घेऊयात.  

5/10

carcharging

दिल्लीचं उदाहरण घ्यायचं झालं तर येथे 4 रुपये प्रति किलो व्हॅट दराने इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठीचा दर आहे. 

6/10

carcharging

संपूर्ण भारताचा विचार केल्यास हा दर 2 रुपये प्रति किलो व्हॅट ते 9 रुपये प्रति किलो व्हॅटपर्यंत आहे.

7/10

carcharging

म्हणजेच 20 ते 40 किलो व्हॅटची बॅटरी चार्ज करण्यासाठी 4 रुपये प्रति किलो व्हॅट दराने 100 रुपये ते 200 रुपये लागतील. तर घरी बॅटरी चार्ज करायची म्हटलं तर हा खर्च 180 रुपये ते 500 रुपयादरम्यान येईल. एक लिटर पेट्रोलचा दर आज 100 रुपयांहून अधिक आहे.

8/10

carcharging

आता कारची बॅटरी संपूर्ण चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो हे कारचं मॉडेल कोणतं आहे, बॅटरी, चार्जर कसा आहे, चार्जिंग पॉइण्टचा स्पीड किती आहे यासारख्या गोष्टींवर अवलंबून असतं.  

9/10

carcharging

सामान्यपणे तासाभरामध्ये बॅटरी 80 टक्क्यांपर्यंत चार्ज व्हायला हवी. मात्र हा वेळ वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे.   

10/10

carcharging

रॅपिड चार्जरचा वापर केल्यास अवघ्या 30 ते 40 मिनिटांमध्ये गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज होऊ शकते.