कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड
ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने कल्याणमधील एका हॉटेलवर छापा मारत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
कल्याण : ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने कल्याणमधील एका हॉटेलवर छापा मारत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
हा छापा मारल्यानंतर पोलिसांनी सहा कर्मचा-यांना अटक केली आहे. तर, चार महिलांची सुटका केली आहे.
पोलिसांनी छापा मारलेलं हे हॉटेल भाजपचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या पत्नी रंजना पाटील यांच्या मालकीचे असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाला या सेक्स रॅकेट संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर बुधवारी 'रिलॅक्स अॅड गार्डन' या हॉटेलवर छापा मारण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत हॉटेल मॅनेजर हरिश्चंद्र शेट्टी, कॅशिअर राहूल दत्त, वेटर सत्यनारायण पाल, रमाकांत महंत, विजय शेट्टी आणि विग्यान शामल या सहा जणांना अटक केली. या सर्वांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.
बांगलादेशी महिलेकडे वैध असलेला पासपोर्ट आणि व्हिसा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.