ठाणे : कल्याण ते वसई जलवाहतुकीसाठी आता हालचाल सुरू झालीय. जलवाहतुकीचा पहिला टप्पा 2019 मध्ये सुरू होण्याच्या मार्गावर आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ते वसई या पहिल्या टप्प्याची पाहणी केली. कल्याण ते वसई या जलवाहतुकीचा फायदा कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, ठाणे, मीरा भाईंदर तसंच वसई या भागातल्या नागरिकांना होणार आहे. 


पहिल्या टप्प्यात १० जेट्टी उभारण्यात येणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकल्पाचे सल्लागार कॅप्टन रोहिल्ला यांच्यासह पहिल्या टप्प्याची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १० जेट्टी उभारण्यात येणार असून कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, पारसिक, कोलशेत, काल्हेर, गायमुख, मीरा-भाईंदर, वसई अशा नऊ ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहे. 


तिसऱ्या प्रकारात ठाणे नवी मुंबई जोडण्याचा प्रस्ताव


दुसऱ्या टप्प्यात ठाणे मुंबई जोडण्याचा प्रस्ताव आहे. तर तिसऱ्या प्रकारात ठाणे नवी मुंबई जोडण्याचा प्रस्ताव आहे. खाडीभागातून साधारण १०० मीटरच्या पट्ट्यावर नेविगेशन मार्किंग होणार असून दिवसा आणि रात्रीदेखील नजरेत येतील अशा खुणांनी सुरक्षित मार्ग आखण्यात येणार आहे.