ठाणे : कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याविरोधात आता भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. कल्याण पश्चिमेतील सर्व भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भाजपच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करण्याचा उघड उघड इशारा शिवसेनेने दिला होता. सुरुवातीला नरेंद्र पवार यांच्या उमेदवारीला आक्षेप घेणारे भाजपमधील इच्छुक पदाधिकारीही हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने नाराज झाले आहेत. 


विद्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, असा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. त्यावर आता नरेंद्र पवार काय निर्णय घेतात हे लवरकच स्पष्ट होईल. जर पवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर शिवसेनेसाठी ही जागा धोक्याची ठरु शकते. त्यामुळे भाजप पवार यांचे मन कसे वळवतात याची उत्सुकता आहे.