रत्नागिरी : कंगना राणौत वादावर शिवसेना नेत्यांकडून आता प्रतिक्रिया देण्यास नकार दिला जातोय. याचाच प्रत्यय उदय सामंत यांच्या रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेत आला.  कंगना प्रकरणावर प्रश्व विचारले असता कोण कंगना? मी सध्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आहे..कुठं काय बोलावं याला बंधनं आहेत. तसेच प्रवक्ता असलो तरी प्रत्येक गोष्टीत बोलावं असं बंधन नाही असं उत्तर सामंत यांनी दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या बंगल्याच्या पाटीला काळं फासण्याची घटना घडली. असं काळं फासणाऱ्यांचं तोंड काळं होणार, अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे. 


तसंच मराठा आरक्षण कायम राहावं ही महाविकास आघाडीची भूमिका आहे. यासंदर्भातील योग्य भूमिका अशोक चव्हाण मांडतील असं म्हणत उदय सामंत यांनी विद्यार्थ्याचं आत्महत्या प्रकरण असो अथवा मराठा आरक्षणाचा प्रश्न यावर थेटपणे बोलणं टाळलं आहे.


 पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत २१ विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. यंदा पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांची पसंती असल्याची माहिती देखील यावेळी सामंत यांनी दिली.