Sanjay Raut : सीमावादावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना धमकी देण्यात आलीय. जीवे मारण्याची धमकी देणारे 2 फोन कॉल्स आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. कन्नड वेदिके संघटनेने (kannada rakshana vedike) ही धमकी दिल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊतांनी वाचाळ बडबड बंद करावी, धमकी दिल्याचं सांगायला 24 तास का लागले असा सवाल मंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय. संजय राऊतांनी तक्रार केली तर पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. आणि या चौकशीत संपूर्ण सत्यता समोर येईल असा विश्वासही शंभूराज देसाईंनी व्यक्त केलाय.


काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांना हा धमकीचा फोन आला आहे. कन्नड वेदिका संघटनेने ही धमकी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्राला टार्गेट करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. हे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करते असे संजय राऊत म्हणाले होते.


आम्ही किती संयम बाळगावा? - उद्धव ठाकरे


"संजय राऊत यांना उघड उघड धमक्या देत आहेत. तरी सुद्धा आम्ही संयम बाळगावा. मुख्यमंत्री वारंवार नवस फेडायला आणि नविन नवस बोलायला दिल्लीत जातात. बेळगावच्या देवाला देखील नवस बोलून संजय राऊत यांना येत असलेल्या धमक्यांवर कारवाई करावी. राख रांगोळी. राख आमच्याकडे आणि रांगोळी दुसऱ्यांना. म्हणजेच विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राच आणि चांगले प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात जातात," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.