कर्जत : सोनगिरीच्या जंगलात हरवलेल्या १७ गिर्यारोहकांची सुटका करण्यात आली आहे. सहा तासांच्या शोधमोहीमेनंतर जंगलात हरवलेल्या गिर्यारोहकांना शोधण्यात कर्जत पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांना यश आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गिर्यारोहकांच्या ग्रुपमध्ये सहा महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वच्या सर्व लोक एकाच ऑफिसमधील आहेत. परतीच्या मार्गावर रस्ता न मिळाल्याने हे सर्व गिर्यारोहक सोनगिरी जंगलातच भरकटले. वाट चुकल्याचे लक्षात येताच ग्रुपमधील काही जणांनी पोलीस कंट्रोलरुमला संपर्क साधून, याची माहिती दिली. 



या माहितीच्या आधारे, कर्जतच्या सीनियर पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले.